कोरोनावर लस मिळेपर्यंत ३०-५० हा फॉर्म्युला वापरा : वैज्ञानिकांचा सल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2020
Total Views |
Lockdown _1  H





लंडन : जोपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होऊ शकत नाही, तोपर्यंत ५० दिवस लॉकडाऊन आणि ३० दिवस सवलत द्या, असा फॉर्म्युला अंमलात आणावा, अशी सूचना वैज्ञानिकांनी केली आहे. कँब्रिज विद्यापीठातील भारतीय मूळ संशोधक राजीव चौधरी आणि त्यांची टीम या संदर्भात एक अभ्यास करत आहे. याच्या निष्कर्षांत त्यांनी हा सल्ला दिला आहे. 

 
अभ्यासानुसार, ५० दिवस कडक लॉकडाऊन आणि निर्बंध घालायला हवेत. यात कुठलीही सवलत दिली जाऊ नये. त्यानंतर पुढील ३० दिवस सोशल डिस्टंसिंग आणि निर्बंध ठेवूनच नियम शिथिल करायला हवेत. कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत पुढील दीड वर्ष हे चक्र असेच सुरू ठेवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 


 
यामुळे कोरोनाच्या विळख्यात सापडणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी होईल. अर्थव्यवस्थाही मंद का होईना मात्र, सुरू राहिल 'यूरोपीयन जर्नल ऑफ इपीडीमिलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात जगातील सरकारद्वारे स्थापन झालेल्या या विषाणूला रोखण्याचा वेग हा सरासरी ०.८ टक्के इतका आहे, असेही म्हटले आहे.




@@AUTHORINFO_V1@@