देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखाच्या पार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |

corona_1  H x W


तर, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ!!

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ११४२ इतकी झाली आहे. सोमवारी देशभरात ४६२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३९ हजार २३३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या सगळ्यात समाधानकारक बाब म्हणजे रुग्णांचा बरा होण्याचा दर वाढून ३८.२९% इतका झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात १ लाख लोकसंख्येमागे ७.१ कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर लॉकडाउननंतर ३३% कर्मचार्‍यांसह कार्यरत असणाऱ्या केंद्राने आता आपल्या ५०% कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सांगितले आहे.


सोमवारी महाराष्ट्रात २००५, तमिळनाडुत ५३६, गुजरातमध्ये ३६६, राजस्थानात ३०५, दिल्लीत २९९, मध्यप्रदेशात २५९, उत्तरप्रदेशात १४१, पश्चिम बंगालमध्ये १४८, बिहारमध्ये १०३, जम्मू-कश्मीरमध्ये १०६, कर्नाटकात ९९, आंध्रप्रदेशात ५२, ओडिशात ४८ रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात १ लाख १ हजार १३९ कोरोनाग्रस्त आहेत. ५८ हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू असून ३९ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ३१६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@