का डिलीट झाला Carry Minatiचा व्हीडिओ ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |
carry minati vs amir _1&n
 
 


काय आहे युट्यूब विरुद्ध टीकटॉक वाद ?

वेब डेस्क :  सोशल मीडियावर युट्यूब विरुद्ध टीकटॉक हे द्वंद्वयुद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कॅरी मिनाटी आणि आमीर सिद्दीकी यांच्यात रंगलेल्या वाक् युद्धाला वेगवेगळी वळणेही मिळाली, अशातच कॅरी मिनाटीचा रोस्टींग व्हीडिओ ज्यात त्याने टीकटॉकर्सचा खरपूस समाचार घेतला होता, तो व्हीडिओ डिलिट करण्यात आला. हा व्हीडिओ का डिलिट करण्यात आला याची माहिती कॅरी मिनाटीलाही नाही. परंतू या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 




याचे महत्वाचे कारण म्हणजे सायबर बुलिंग असण्याची शक्यता आहे. सायबर बुलिंग म्हणजे नेमके काय ? खरंच कॅरी मिनाटीचा व्हीडिओ या अंतर्गत कारवाईमुळे डिलिट करण्यात आला आहे का ?, असे अनेक प्रश्न खुद्द कॅरी मिनाटी आणि असंख्य युट्यूबर्सला पडले आहेत. सायबर बुलिंग म्हणजे कुठल्याही व्यक्तीला अर्वाच्य भाषेत संदेश पाठवणे, त्याच्याशी संवाद करणे, एखाद्याला त्रास होईल, असे वक्तव्य किंवा कृती करणे. सोशल नेटवर्कींग साईट्सवर वैयक्तीक टीका करणे या अंतर्गत हा गुन्हा मानला जातो. 


 
भारतीय दंड विधान संहिता कलम ४९९ एखाद्या व्यक्तीवर आरोप करणे, चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हा गुन्हा ठरू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणून एखाद्या व्यक्तीच्या भूमीकेवर टीका टीपण्णी करताना समोरच्याचा आदर राखणेही गरजेचे आहे. कलम ५०० अनुसार दोन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड किंवा दोन्ही अशा स्वरुपाची कारवाई केली जाऊ शकते. कॅरी मिनाटीच्या या व्हीडिओमध्ये सायबर बुलिंगच्या कायद्याचे उल्लंघन झाले, असल्याने व्हीडिओ डिलिट केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाल्याची अधिकृत माहिती नाही.




carry minati _1 &nbs
 
कोण आहे कॅरी मिनाटी ?
अजेय नागर म्हणजेच कॅरी मिनाटी हा मुळचा फरिदाबाद येथे राहणारा एक युट्यूबर असून त्याचा व्हीडिओ कंटेट रोस्टींग या प्रकारात मोडतात. कॅरी मिनाटी एखाद्या हास्यास्पद गोष्टीचा किंवा घटनेचा खरपूस भाषेत समाचार घेणारे व्हीडिओ तो तयार करतो. सुरुवातीच्या काळात त्याने ऑनलाईन गेम्स खेळांचे समालोच (कॉमेंट्री) केली. यानंतर त्याने स्वतः कॅमेऱ्यासमोर राहून व्हीडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्याचे एकूण १.७९ कोटी सबस्क्रायबर आहेत. त्याने तयार केलेला युट्यूब विरुद्ध टीकटॉक हा व्हीडिओ जगातील सर्वात पाहिला गेलेला नॉनम्युझिक व्हीडिओ ठरला. सहाजिकच त्याचे फॅन्स व्हीडिओ डिलिट झाल्यामुळे नाराज आहेत.
 



amir siddhiqi  _1 &n



कोण आहे आमीर सिद्दीकी ?
आमिर सिद्दीकी हा मुळचा मुंबईतील राहणारा असून तो टीकटॉकर आहे. त्याचे एकूण ३.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो टीकटॉकवर कॉमेडी कंटेंट शेअर करत असतो. आमीरने एक व्हीडिओ तयार केला होता. ज्यात टीकटॉक युट्यूबपेक्षा कसा चांगला आहे, असा दावा त्याने केला होता. याच व्हीडिओचा समाचार कॅरीमिनाटीने घेतला. युट्यूबर भडकले होते आणि दोघांमध्ये हे युद्ध सुरू झाले. दरम्यान, कॅरीमिनाटीचा व्हीडिओ डिलिट झाल्यानंतर त्याने युट्यूब VS टीकटॉक दी एण्ड, असा व्हीडिओ अपलोड करत माझ्या वाक्यांचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याची कबुली दिली होती. 
 
आमीर सिद्दीकीनेही कॅरीमिनाटीच्या पहिल्या व्हीडिओला उत्तर देत आम्ही युट्यूबचा विरोध करत नसून केवळ सायबर बुलिंग विरोधात आहोत, असे म्हटले होते. कॅरीमिनाटी हे समजून घेईल, असेही त्याने म्हटले होते. दरम्यान, अद्याप हा वाद थंड झाला असला तरीही सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरूच आहे.
@@AUTHORINFO_V1@@