अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा सॉफ्ट बँकेतून पायउतार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |
Jack Ma _1  H x
 





टोकियो : चीनची दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा यांनी जपानी सॉफ्टबँक समुहाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गेली १३ वर्षे या संचालक मंडळावर असलेल्या जॅक मा यांनी कोरोना संकट काळात तडकाफडकी राजीनामा दिल्याने औद्योगिक विश्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 



सॉफ्ट बँकेवर सध्या कर्जाचा डोंगर असल्याचे म्हटले जात आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, सॉफ्टबँकेतर्फे 'वीवर्क'मध्ये केलेल्या जोखमीच्या गुंतवणूकीमुळे जॅक मा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. सॉफ्ट बँकेच्या तिमाही आर्थिक निकालांपूर्वीच जॅक मा यांनी राजीनामा दिला. २००७मध्ये जॅक मा यांचे सॉफ्ट बँकेचे पहिल्यांदा संबंध आहे. संस्थापक मासायोशी सोन यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याचे बोलले जाते. 



२००० मध्ये सोन यांनी अलीबाबा या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. २०१४मध्ये सोन यांनी ही गुंतवणूक वाढवत ६० अब्ज डॉलर इतकी केली. सॉफ्ट बँकेची अलीबाबामध्ये २५.१ टक्के हिस्सेदारी होती. ही गुंतवणूक एकूण १३३ अब्ज डॉलर इतकी आहे. जॅक मा हे केवळ एकमेव संचालक आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 




दरम्यान, सॉफ्टबँकेने तीन नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. यात सॉफ्ट बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी योशिमित्सू गोटो, कॅडेंस डिझाइन सिस्टम्सचे सीईओ लिप-बू तान आणि वासेद बिझनेस स्कुलचे प्राध्यापक युको क्वामोटो यांचा सामावेश आहे. जॅक मा यांनी २०१९ सप्टेंबरमध्ये अलिबाबाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. निवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. कोरोना महामारीच्या काळातही जॅक मा यांनी विविध प्रकारची मदत केली आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात जॅक मा यांनी एक इंग्रजी शिक्षक म्हणून केली होती.




@@AUTHORINFO_V1@@