कोरोनाचा इफेक्ट : झोमॅटोने केली १३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात

    16-May-2020
Total Views | 44

Zomato_1  H x W


उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योग क्षेत्रांना बसला आहे. या फटक्यातून ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यादेखील सुटलेल्या नाहीत. ऑनलाईन फूड डिलिव्हरीत अग्रेसर अशा झोमॅटोने या संकटात आता आपल्या १३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर उर्वरित कर्मचाऱ्यांचा जून महिन्यापासून ५० टक्के पगार कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही पगार कपात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.


देशभरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. परिणामी कोरोनामुळे भारतील अर्थव्यवस्थेला जबरदस्त झटका बसला असल्यामुळे अनेक व्यवसाय सध्या बंद होण्याच्याही मार्गावर आहेत. झोमॅटोसारख्या अग्रेसर कंपनीलाही याचा फटका बसला आहे. या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या नोटीशीमध्ये संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले की, आमच्या कामावर आम्हाला लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि हीच आमची इच्छा आहे. पण भविष्यात आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आम्हाला जमणार नाही. तसेच येत्या २४ तासात सर्व टीम लीडर्सकडून ज्यांची नोकरी गेली आहे, त्यांना झूम कॉल करून सांगण्यात येणार आहे आणि ज्यांची नोकरी टिकली आहे. त्यांनाही त्या स्वरूपाचा मेल एचआरकडून येईल, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121