झूम मिटिंग प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे का ? केंद्रीय गृह मंत्रालयाची सूचनावली

    16-Apr-2020
Total Views | 72

zoom meetings_1 &nbs




नवी दिल्ली
: झूम मिटिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबाबत वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर समन्वय केंद्राने सूचनावली जारी केली आहे. हा मंच सरकारी कामासाठी, सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरासाठी नाही असे या सुचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी ‘झूम’ अॅप' वापरले जात आहे. गेल्या काही दिवसात भारतात अनेक यूझर्स खासगी आणि कार्यालयीन कामकाजासाठी ‘झूम’ अॅपवर व्हिडिओ कॉन्फरन्स करत असल्याची माहिती आहे.


‘कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’ (सीईआरटी) या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने ‘झूम’ अॅपबाबत धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने तातडीची पावले उचलली गेली. खाजगी वापरासाठी अद्यापही या मंचाचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली. ‘झूम’ अॅपवरील कॉन्फरन्स रुममध्ये अज्ञात व्यक्तींना प्रवेश न देणे, पासवर्ड वापरुन हॅकर्सपासून सावध राहणे अशी काळजी घेण्यास वापरकर्त्यांना सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांना कार्यालयीन कामकाजाची संवेदनशील माहिती मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.





झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स फॉर एजुकेशन, स्लॅक, सिस्को वेबएक्स असे ऑनलाइन कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म मीटिंग आणि वेबिनारसाठी वापरले जात असल्याकडे ‘सीईआरटी’ने याकडे लक्ष वेधले. सरकारच्या सायबर कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच ‘सायकॉर्ड’ने जारी केलेली ही नवी सूचनावली खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा वैयक्तिक अॅपधारक (मित्र आणि नातेवाईकांना व्हिडिओ कॉल) करणाऱ्यांसाठी आहे. कारण सरकारी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी एनआयसी (राष्ट्रीय माहिती केंद्र) हा प्लॅटफॉर्म बहुतेकदा वापरला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.शासकीय अधिकार्‍यांना बैठक आयोजित करण्यासाठी कोणतेही ‘थर्ड पार्टी अ‍ॅप’ किंवा सेवा न वापरण्याच्या सूचना आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121