वांद्रेतील घटना राज्य सरकारचे अपयश : संबित पात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |

sambit patra_1  

नवी दिल्ली :
आम्हाला आमच्या गावी परत जाऊ द्या या मागणीसह हजारोंचा जमाव वांद्रे स्थानकावर एकत्र झाला. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजले. 'मुंबईतील वांद्रे स्थानकावरील आजची घटना हे राज्य सरकारचे अपयश असल्या'ची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. कलम १४४ लागू असताना वांद्रे स्थानकावर एवढी गर्दी कशी जमली यावरून सध्या राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित केले. यावेळी देशातील लॉकडाऊन आणखी १९ दिवसांसाठी म्हणजेच ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच सर्व राज्यांची मते लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. रेल्वेसेवा ठप्प आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीपासूनच अन्य राज्यांतून रोजगारासाठी मुंबईत आलेले हजारो मजूर मुंबईत अडकून पडलेले आहेत. केंद्राने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवताना त्याची आणखी कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबले आहे.
@@AUTHORINFO_V1@@