कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश बंद!

    30-Mar-2020
Total Views | 66
apmc market_1  

एपीएमसी प्रशासनाचा सोशल डिस्टन्सिंगसाठी मोठा निर्णय 

नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाकडून रोज नवनवीन उपयोजना करून सुद्धा एपीएमसी बाजारात गर्दीमूळे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे कठीण झाले आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने बाजार विस्तार करण्याचे ठरवले आहे. तसेच बाजारात किरकोळ खरेदीदांना आत सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारातील गर्दी कमी झाली नाही तर संपूर्ण बाजार खारघर येथे हलवण्यात येईल, असा निर्णय कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांसोब झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणंही बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये शहरातील काही बड्या बाजारपेठा मात्र सुरु ठेवण्यात आल्या आहेत. पण या बाजारपेठेतील गर्दी सध्या धोकादायक ठरत आहे. ही गर्दी कमी झाली नाही, तर हा भाजीपाला आणि फळ बाजार वाशी येथून खारघर येथे हलवण्यात येणार आहे. बाजारपेठ दुसरीकडे स्थलांतरीत करणार त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाचे निर्णय
  • गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला मंडी एसटी महामंडळ यांच्या चार एकर मोकळ्या जागेवर २०० हलवण्यात येईल. यामुळे मूळ बाजारात गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.



  • भाजीपला आणि फळे बाजाराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ ५०० मीटरपर्यंत १० लेनची मोठी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. या बैरिकेटिंगच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग प्रणालीचा वापर करून व्यापारी, कामगारांना आत सोडण्यात येणार आहे.



  • वाशी येथे आजपासून भाजीपाला आणि फळ बाजाराच्या आवारात किरकोळ खरेदीदाराना प्रवेश बंद करण्यात आली आहे. आता फक्त होलसेलर यांनाच आत सोडण्यात येणार. त्याच बरोबर आतमध्ये प्रत्येक गाळा बाहेर एक मीटरची सोशल डिस्टन्सिंग कठोर रित्याने पालन करण्यात येईल.



  • बाजार समितीत असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटकांनी जर हे नियम तोडले तर भाजीपाला आणि फळ बाजाराच्या जवळ जवळ २००० व्यापाऱ्यांना खारघर येथे सेंट्रल पार्कच्या जवळ ५० ते ६० एकर भूखंडावर दोन ते चार दिवसात पाठवण्या येईल.



  • वाशी येथे आजपासून भाजीपाला आवारात ३०० गाड्या सोडण्यात येणार आहे. जे नियम तोडतील त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121