काबूलमध्ये गुरुद्वारात आत्मघातकी हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |

kabul attack_1  



भीषण हल्ल्यात ११ जण ठार




काबुल : जगभरात कोरोनाची धास्ती असतानाच अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज आत्मघातकी हल्ल्यामुळे हादरले. काबूलमधील जुन्या शहराच्या मध्यभागी असलेल्या गुरुद्वारामध्ये बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारा बंदूकधारी हल्लेखोराने हल्ला केला. यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. एका शीख खासदाराने याची माहिती दिली. शीख समाज अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याक आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. अजूनही गोळीबार सुरु असल्याचे अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले आहे.


खासदार नरिंदर सिंह खालसा यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गुरुद्वारात असलेल्या एका व्यक्तीने मला फोन करुन हल्ल्याबाबत सांगितले. त्यानंतर तिकडे लगेच मदत पाठवण्यात आली. हल्ल्यावेळी गुरुद्वारात सुमारे १५० लोक होते. या हल्ल्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांना बाहेर काढण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.


या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. परंतु, तालिबानचा प्रवक्ता जुबिहुल्ला मुजाहिदने टि्वट करुन या हल्ल्यामागे तालिबानचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. या महिन्याच्या सुरुवातील आयसिसशी संबंधित एका संघटनेने काबूलमध्ये अल्पसंख्यक शिया मुस्लिमांच्या एका धार्मिक कार्यक्रमात हल्ला केला होता. यात ३२ जण ठार झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@