पाकचा 'या' खेळाडूंना भोगावा लागणार तुरुंगवास

    08-Feb-2020
Total Views | 45

PCB Spot Fixing_1 &n
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट आणि स्पॉट फिक्सिंगचे नाते हे काही जगाला नवीन नाही. अनेकदा या गोष्टींमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना शिक्षा भोगाव्या लागल्या आहेत. यावेळी या प्रकरणामध्ये अडकलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावेही आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज नासिर जमशेदला मॅनचेस्टरच्या क्राउन न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये १७ महिन्यांचा तुरुंगास ठोठावला आहे. ३३ वर्षीय नासिर जमशेदला डिसेंबर २०१९मध्ये नयायलायाने दोषी घोषित केले होते. त्याच्यासोबत युसूफ अनवर आणि मोहम्मद इजाजला ४० आणि ३० महीन्यांची शिक्षा सुनावली आहे. या दोघांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूंच्या खराब प्रदर्शनासाठी पैसे घेतल्याचे कबुल केले होते. जमशेदवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २०१८ मध्ये १० वर्षांचा बॅन लावला होता.
 
पोलिस अधिकाऱ्याने स्टींग ऑपरेशन करुन स्पॉट फिक्सींगचे प्रकरण उघड केले होते. ब्रिटेनच्या नॅशनल क्राइम एजेंसीने मागील वर्षी स्पॉट फिक्सिंगच्या तपासादरम्यान जमशेद, यूसूफ अनवर आणि मोहम्मद इजाजला अटक केली होती. सुरुवातील तिघांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये फिक्सिंग केल्याच्या आरोपांचे खंडन केले होते. पण, डिसेंबर २०१९ मध्ये न्यायालयात झालेल्या सुनावनी दरम्यान फिक्सींग केल्याचे कबुल केले.
 
फिक्सिंग प्रकरणात शरजीलला पीसीबीने ५ वर्षांचा बॅन लावला होता
 
जमशेदने दुबईमध्ये २०१८मध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या पेशावर जाल्मी आणि इस्लामाबाद यूनायडेटमध्ये झालेल्या सामन्यात स्पॉट फिक्सिंग केली. यासाठी त्याने पेशावर जाल्मीचा खेळाडू शरजील खानला इस्लामाबाद संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये दोन डॉट बॉल खेळायचे होते. यानंतर पीसीबीने शरजील आणि खालिद लतीफला पाच वर्षांसाठी बॅन केले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121