मलालावर गोळी झाडणारा दहशतवादी फरार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |

malala_1  H x W



अल्लाहच्या मदतीने मी कैदेतून निसटण्यात यशस्वी ठरलो असे म्हणत व्हायरल केली ऑडिओ क्लीप
इस्लामाबाद : नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफजर्ई हिच्यावर गोळी झाडून, तिच्या हत्येचा प्रयत्न करणारा दहशतवादी पाकिस्तानच्या तुरुंगातून फरार झाला आहे. एहसानुल्ला एहसान असे या दहशतवाद्याचे नाव असून, पेशावरमधील शाळेवरच्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचा हात होता. २०१४ साली झालेल्या पेशावर शाळा हल्ल्यात तब्बल १३२ चिमुरडे ठार झाले होते.

एहसानुल्लाह एहसानची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पाकीस्तान सिक्युरिटी एजन्सीच्या कैदेतून आपण ११ जानेवारी रोजी निसटल्याचे त्याने या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटले आहे. आपण शरण जाताना पाक सेनेने आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचेही त्याने यात म्हंटले आहे.

आपण पाक सेनेसोबत झालेल्या चर्चेनंतर ५ फेब्रुवारी २०१७ रोजी आत्मसमर्पण केले होते. मी या कराराचे तीन वर्षांपर्यंत पालन केले. परंतु, सुरक्षा एजन्सीने कराराचे उल्लंघन करत माझ्या मुलांसह मला कैद केले. त्यानंतर सुरक्षा एजन्सीच्या तावडीतून मुक्त होण्याचा मी निर्णय घेतला. अल्लाहच्या मदतीने मी ११ जानेवारी रोजी कैदेतून निसटण्यात यशस्वी ठरलो, असे एहसानुल्लाहने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात मलाला युसुफजई हिच्यावर २०१२ मध्ये मुलींच्या शिक्षण अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. यात मलाला गंभीर जखमी झाली होती.
@@AUTHORINFO_V1@@