कल्याण-कसारा मार्गिका वर्षअखेरपर्यंत होणार पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2020
Total Views |
Kalyan-Kasara _1 &nb



चार वर्षांपासून रखडले होते काम



शहापुर (प्रशांत गडगे) : मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा स्थानकादरम्यान तिसरे आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. परंतु, भूसंपादनातील अडचणीमुळे हे काम चार वर्षापासून रखडले आहे. आता तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
 
 
नव्या मार्गिकेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच लोकलच्या आणखी २४ फेऱ्या वाढण्याची होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मार्च २०२० पर्यंत पूर्ण करायचा होता मात्र फक्त तिसऱ्या मार्गे चे काम या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकल्प लांबल्यामुळे आंदाजित ७९३ कोटीचा प्रकल्प खर्च १०० कोटींनी वाढुन ९०० कोटीवर गेला आहे. कल्याण-कसारा दरम्यान उपनगरीय रेल्वेसेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी केवळ दोन मार्गिका आहेत. त्यात या मार्गिकेवर मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य द्यावे लागत असल्यामुळे या मार्गावर लोकल नेहमिच विलंबाने धावतात. एक्सप्रेस किंवा मालगाडी अपघात झाल्यास रेल्वे मार्ग बंद होतो तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उपनगरीय सेवेला फटका बसतो.
 

 
त्यामुळे या दोन मार्गांवर जादा ताण येत असल्याने तिसऱ्या मार्गाची मागणी प्रवासी संघटना सातत्याने करत आहेत. समस्येवर उपाय म्हणून कल्याण-कसारा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने २०११ मध्ये तिसर्यार मार्गीकेला मान्यता दिली मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात २०१६ मध्ये झाली. यंदाच्या अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद करण्यात आली असली तरी भूसंपादन अभावी एक काम पूर्ण होऊ शकले नाही. आता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वर्षाच्या अखेरपर्यंत हे मार्गिका खुली करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे या सूत्रांनी सांगितले आहे.





@@AUTHORINFO_V1@@