'जनाब'सेनेचे मनापासून अभिनंदन ; भाजपचा शिवसेनेला टोला

    31-Dec-2020
Total Views | 1173

shivsena_1  H x



मुंबई :
शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपने शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूरासह शिवसेनेने शिवशाही हे कॅलेंडर छापले असून त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवशाही कॅलेंडरचा फोटो टॅग करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.



भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवशाही कॅलेंडरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी यासोबत "शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही...," असं म्हणत खोचक टोला लगावला. "शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही," असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.



भातखळकर म्हणतात, "अजान स्पर्धेचं आयोजन केलं त्यावेळीच मी म्हटलं होतं की शिवसेनेनं आता भगवा तर सोडलाच केवळ हिरवा हाती घेणं बाकी आहे. वडाळा विधानसभेच्या शिवसेनेनं उर्दूमध्येच कॅलेंडर काढलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जनाब बळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. यामध्ये उर्दू, मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदयही देण्याचं काम केलं. याव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतींच्या दिवशी केवळ शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस यातून करण्यात आलं आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो," असंही ते म्हणाले. औरंगाबादचं संभाजीनगर नाही पण मतांच्या लालसेपायी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नामांतरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं करून दाखवलं असल्याचंही ते म्हणाले.


कॅलेंडरमध्ये नेमकं काय ?


या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं नमूद करण्यात आलं आहे. यावर मराठी इंग्रजीसोबतच उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला आहे. तसंच यावर एका ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेला देशभरात उर्त्स्फुत प्रतिसाद --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेला देशभरात उर्त्स्फुत प्रतिसाद --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंदुर ऑपरेशन करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला .सिंदुर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दबल भारतीय सैन्याचे आणि प्रधानमंत्री नरेद्र मोदींचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सिंदुर ऑपरेशनचा विजय साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरात भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.त्यांच्या आवाहनाला देशभरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121