नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दिल्ली मेट्रोच्या मेजेन्टा लाईन जनकपुरी पश्चिम - बोटॅनिकल गार्डनवर भारताच्या पहिल्या चालकरहीत मेट्रो ऑपरेटिंग सेवेचे उद्घाटन केले आहे. दिल्ली मेट्रोच्या म्हणण्यानुसार, या नव्या पिढीच्या गाड्या चालविण्यामुळे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) जगातील अशा सात टक्के मेट्रो नेटवर्कच्या विशेष गटात समाविष्ट होणार आहे ज्या चालकरहित परिचालन सेवा पुरवत आहेत. मेट्रो सेवेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन'वर 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' सेवेचे देखील उदघाटन केले.
डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार विना चालक मेट्रो धावल्यानंतर दिल्ली मेट्रोचे नावही जगभरातील अग्रणी मेट्रो सेवांमध्ये नोंदले जाईल. जून २०२१ पर्यंत पिंक लाईन म्हणजे मजलिश पार्क ते शिव विहार या मेट्रो मार्गावरील ५७ किलोमीटर विना चालक मेट्रो धावण्याची शक्यता आहे. म्हणजे दिल्लीतील चाकरमान्यांना एकूण ९४ किलोमीटरचा प्रवास विना चालक मेट्रोतून करता येणार आहे. नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड म्हणजे एनसीएमसीची सुविधाही मेट्रो प्रवाशांसाठी मोठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्डच्या माध्यमातून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवास करता येणार आहे. २०२२पर्यंत दिल्ली मेट्रोच्या सर्व लाईन्सवर कॉम मोबॅलिटी कार्डद्वारे प्रवासाची सोय होण्याची शक्यता आहे.
पश्चिम आणि दक्षिण दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा
मेजेंटा लाईनवर जनकपुरी ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन या मार्गावर सुरु होणाऱ्या विना चालक मेट्रो सेवेमुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोज लाखो प्रवासी कॉरिडॉरवर प्रवास करतात. त्यात आयटी कंपन्या आणि नोयडातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मेट्रो विना चालक असल्यामुळे वेळेचं खास बंधन असेल. त्याचबरोबर कधी उशीर झाला तर वेग वाढवून प्रवाशांना वेळेत त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत.