मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

    19-Dec-2020
Total Views | 97

Sports_1  H x W
मुंबई : सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ३० डिसेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१९-२० या वर्षाकरिता पुरस्कार देण्यात येणार आहेत.
 
 
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्याचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत. सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामिण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.
 
 
खेळाडू पुरस्कारासाठी ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्हयाचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३० डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पु्र्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/२८८७११०५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121