सरनाईक मोठ्या अडचणीत : धक्कादायक माहिती उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2020
Total Views |

Pratap Sarnaik_1 &nb
 

 
 
ठाणे : मनी लाँड्रींग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचनालय (ED) ईडीने कोठडी अहवाल केला आहे. त्यात थेट सरनाईक यांचेच नाव उघड झाले असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
 
 
 
एमएमआरडीएमध्ये बोगस टॉप्स सुरक्षारक्षकांची निम्मी रक्कम सरनाईक यांना जात असल्याचा दावा ईडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे यांना अटक झाल्यानंतर कोठडी मिळावी म्हणून त्यांच्या अहवालात सरनाईक यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोठडी अहवालात ईडीतर्फे थेट सरनाईक यांचेच नाव घेतले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला.
 
 
 
सरनाईक यांचे मित्र व बड्या पदावर असलेल्या चंडोळे यांना दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आले आहे. सरनाईक यांचे जूने निवासस्थान व समता नगरच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात चंडोळे राहतात. चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात नशीब आजमावण्यासाठी आले त्यावेळपासून दोघे एकमेकांना ओळखतात.
 
 
विहंग ग्रूप ऑफ कंपनीजला नफा होत गेला. या कंपनीच्या संचालक पदावर चंडोळे आहेत. इतर प्रकल्पांमध्येही त्यांची भागीदारी आहे. त्यांच्यातील दुवा म्हणजे चंडोळे मानले जातात. त्यामुळे त्यांना अटक ही सरनाईकांसाठी मोठी डोकेदुखी मानली जात आहे.
कोणत्या गैरव्यवहारांचे आरोप लावण्यात आले वाचा सविस्तर !
 
 
एमएमआरडीएच्या तिजोरीवर डल्ला
 
एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगारांतील ३० टक्के सुरक्षारक्षकांतील ५० टक्के हिस्सा अमित चंडोळे घेत होते. हा हिस्सा सरनाईक यांचा आहे, अशी माहिती टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते.
 
 
सरनाईकांनी घडवून आणली होती 'बिझनेस डील'
 
 
उद्योगपती राहुल नंदा आणि चंडोळेंची भेट सरनाईक यांनी घडवून आणली होती.
 
 
उड्डाणपूलांवरील सुरक्षा रक्षकांचे ३३ लाख महिना
 
 
मुंबईतल्या सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टॉप्स ग्रुपकडे आहे. ज्यासाठी प्रतिमहिना ३२ ते ३३ लाख रुपये एमएमआरडीए देणार होती. टॉप ग्रुप आणि सरनाईक यांच्यात ठरल्या प्रमाणे ५०-५० टक्के हिस्सा कंपनीकडून सरनाईक यांच्याकडे रोख रक्कमेत चंडोळे यांना दिला जात होता.
 
 
 
चंडोळेंना पगार ६ लाख रुपये
 
 
टॉप ग्रुप कंपनी दर महिन्याला सहा लाख रुपये व्यावसायाच्या वृद्धीसाठी देत होती. ही नोंद अमित चंडोळे यांना दर महिन्याला सहा लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली होती.
 
 
रोख रक्कम किंवा ई-बँकींगद्वारे दिली जायची रक्कम
 
एमएमआरडीए आणि टॉप ग्रुप कंपन्यांमध्ये ठरलेल्या व्यवहारानुसार, ५० टक्के राहुल नंदा आणि सरनाईक यांच्या ठरलेल्या करारानुसार किंवा त्याहून जास्त स्वरुपात रोख किंवा ई-बँकींगद्वारे दिली जात होती.
 
 
तोंडी व्यवहार
 
एमएमआरडीए सुरक्षारक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी ५० टक्के नफा या टेंडरमधून दिला जायचा, यात ५० टक्के नफा टेंडरमधून सरनाईकांना दिला जायचा असा गंभीर आरोप ईडीने न्यायालयासमोर केला आहे.





@@AUTHORINFO_V1@@