पत्रीपूल होणार कधी ? एक न सुटलेला प्रश्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020
Total Views |
BJP Kalyan_1  H


भाजप नगरसेविकेचे निषेध आंदोलन 


कल्याण : पत्रीपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी स्थानिक नागरिकांसह पत्रीपूल परिसरात आंदोलन केले. हातात प्रशासन विरोधी मजकूराचे काळे फलक घेऊन त्यांनी प्रशासकीय यंत्रणांचा निषेध केला. कधी होणार पत्रीपूल यासह अन्य काही मागण्याचे निवेदन ही त्यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सरूयवंशी यांना दिले. मात्र प्रशासनाकडून त्यांना अद्याप कोणत्याच मागणी संदर्भात ठोस असे उत्तर देण्यात आले नाही.


पत्रीपुलाच्या कामामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असून पत्रीपूल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ही घरी जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. तर वाहतूक कोंडीमुळे पत्रीपूल परिसरातील व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरातील इतर नागरिकांसह स्थानिकांना ही दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


तसेच रेल्वे समांतर रस्त्यांचे काम ही लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ही आंदोलकांनी केली आहे. पत्रीपूल वाहतूकीसाठी बंद असताना वालधुनी पूल ही वाहतूकीसाठी बंद आहे. कोपर पूलाचे काम ही संथगतीने सुरू आहे. परिणामी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांची प्रशासनाने चार ही बाजूने कोंडी केली आहे. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर या त्रसातून नागरिकांची सुटका न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@