शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020
Total Views |

Devendra Fadanvis_1 
मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याचे पडसाद उमटू लागले असून भाजपनेदेखील या कारवाईचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.' अशा शब्दात टीका केली.
 
 
 
 
"शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो" असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
 
 
अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेले वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ऐन दिवाळीदिवशीही रवी राणा यांना कारागृहात काढावा लागत आहे. खासदार नवनीत राणा या आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@