सोनू सूदने संपवली विद्यार्थींनींची १५ किमीची पायपीट

    01-Nov-2020
Total Views | 106

sonu sood_1  H


मुंबई :
कोरोना काळात रिअल लाईफ हिरो ठरलेल्या सोनू सूद अजूनही गरीब व गरजू लोकांना जमेल तशी मदत करत करतो आहे. कोरोनाकाळातील सोनू सूदच्या भरीव कामगिरीमुळे अनेकांना आधार मिळाला.शिक्षण असो वा वैद्यकीय क्षेत्रातील अडचण, घर असो वा घरची परिस्थिती सोनू सूद लाखो नागरिकांसाठी धावून आला आहे. सोनुने आत्ताही एका आदिवासीबहुल गावातील मुलींना सायकली भेट देऊन त्यांच्या भविष्यातील प्रवास सोपा करण्याचे काम केले आहे.


नुकतेच एका संतोष चौहान या ट्विटर युजर्सने सोनू सूदला टॅग करुन मदत मागितली होती. उत्तर प्रदेशातील सोनभद्रा आणि मिर्झापूर येथील हजारो मुलींना ५ वीनंतरचे शिक्षण सोडून द्यावे लागते. त्यामुळे, संतोष नामक युजर्संने सोनू सूदकडे गावातील ३५ मुलींसाठी मदत मागितली. गावातील ३५ मुलींना ८ ते १५ किमीचा दररोज पायी प्रवास करावा लागतो. नक्षल प्रभावित प्रदेश असल्यामुळे जंगलातून मुलींना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे, या मुलींना जर आपण सायकल दिली तर त्यांच्या भविष्याचा प्रवास सुखकर होईल, असे ट्विटर युजर्संने म्हटले होते.



संतोषच्या या मदतीच्या मागणीची हाक सोनू सूदपर्यंत पोहोचली, त्यावेळी सोनूने या सर्व मुलींना नवीन सायकली घेऊन देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी या मुलींच्या गावात नवीन सायकली पोहोचल्या. एका ट्विटर युजर्संने सोनूच्या या सायकल मदतीचं ट्विट केलंय. सोनूने ते ट्विट रिट्विट करुन 'Cycle of Life.Miles to go but the journey is व'असं म्हटलंय. दरम्यान, सोनू सूदने बऱ्याच महिन्यांनंतर सिनेमाच्या शूटींगला सुरूवात केली आहे. याबाबत त्याने सांगितले की, कोरोना काळात त्याने लोकांची मदत केली याचा प्रभाव सेटवर बघायला मिळतो. लोक आदराने विचारपूस करतात, स्वागत करतात. अनेकजण सेटवर भेटायलाही येत असल्याचे तो बोलला.
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121