केंद्राचा मोठा निर्णय ; ओबीसींना सैनिकी शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण

    31-Oct-2020
Total Views | 132

militory schools_1 &


नवी दिल्ली :
२०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून देशातील ३१ सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे भारतातल्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.





सैनिकी शाळांमध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल. हे शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून लागू केले जात आहे. यासंदर्भात सर्व सैनिकी शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेशाची परिपत्रके पाठविली गेली आहेत, अशी माहिती अजय कुमार यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतचे निकष मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार आहेत.


संरक्षण सचिवांनीही या परिपत्रकाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा ज्या ठिकाणी शाळा आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. उर्वरित ३३ टक्क्यांमध्ये इतर राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश दिला जातो. यासाठी 'ए' आणि 'बी' अशा दोन याद्या तयार केल्या आहेत. आता प्रत्येक यादीतील १५ टक्के जागा अनुसूचित जाती, ७.५ टक्के अनुसूचित जमातीसाठी आणि २७ टक्के जागा ओबीसी प्रवर्गासाठी (नॉन क्रीमी लेयर) राखीव असतील. सध्या देशात एकूण ३३ सैनिकी शाळा सुरू आहेत. त्या संरक्षण मंत्रालयांतर्गत सैनिकी स्कूल सोसायटीद्वारे चालवल्या जातात.सध्या सैनिकी शाळांमधल्या ६७ टक्के जागा या ज्या राज्यात शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुलांसाठी असतात, तर ३३ टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात. आता या दोन कॅटेगरीमध्ये सामान्य, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121