दीपिकाच्या मॅनेजरच्या घरावर छापा : हशीश आढळल्याने चौकशी

    28-Oct-2020
Total Views | 150

dipika_1  H x W
 



मुंबई : नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोतर्फे (एनसीबी) आज दीपिका पदुकोणच्या व्यवस्थाक करिश्मा प्रकाश हिला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एनसीबीने करिश्माच्या घरी मंगळवारी छापा मारला होता. त्यावेळी काही प्रमाणात हशीश आढळली होती. त्यावेळी करिश्मा घरी नव्हती. त्यामुळे तिच्या घरी समन्स नोटीस बजावण्यात आली आहे. करिश्मा ड्रग्ज पेडलर्सच्या सतत संपर्कात होती, अशी माहिती तपासात मिळाली आहे.
 
 
 
करिश्माच्या घरी १.८ ग्रॅम हशीश सापडली
 
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार करिश्माच्या शेजारी, ऑफिस कर्मचारी आणि सर्व ओळखीच्या व्यक्तींना सन्मस बजावण्यात आल्याची माहिती पोहोचवण्यात आली आह. एनसीबीच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, करिश्माच्या वर्सोव्यातील घरी छापा टाकण्यात आला होता. तिथे १.८ ग्रॅम हशीश आढळली.
 
 
करिश्माच्या ज्या घरावर कारवाई झाली ते तिचे दुसरे घर आहे. तिथे ती येत जात असते. मात्र, तिच्या वकीलांनी करिश्मा छापा टाकलेल्या घरात राहत नसल्याचे म्हटले आहे. एनसीबीने करिश्माची यापूर्वी दोनवेळा चौकशी केली आहे. एकदा दीपिकासमोर बसवून तिची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्ज चॅट उघड झाले होते. २८ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या चॅटमध्ये दीपिकाने ‘hash’ आणि ‘weed’ या शब्दांचा वापर केला आहे. ‘hash’ हा शब्द हशीशसाठी आणि ‘weed’ हा शब्द गांजासाठी वापरण्यात आल्याचे म्हटले आहे.
 
 

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका आणि करिश्माचे नाव आले कसे ?
करिश्मा प्रकाश ही सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी ‘क्वान’मध्ये काम करते. ही कंपनी ४० हून अधिक बॉलीवुड सेलेब्रिटीजसाठी टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया सहा सुद्धा याच कंपनीत काम करत होती. जया, करिश्माची वरिष्ठ आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने त्यांची चौकशी केली होती. तपासादरम्यान एनसीबीला जया आणि करिश्माबद्दल चॅटची माहिती मिळाली होती. त्यानंतर संशयाची सुई दीपिकावर येऊन पोहोचली.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121