...आणि मुंबई पुन्हा धावली

    12-Oct-2020
Total Views | 108
local mumbai_1  


 

मुंबई : कधीही न थांबणारी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख मिळवलेल्या मुंबई शहराने सोमवारच्या लगबगीच्या दिवशीच काहीसा ब्रेक घेतला. कधीही न झोपणारे शहर, मुंबईकरांच्या पोटापाण्यासाठी सतत धावणारे हे शहर विजकंपन्यांच्या फिडरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले. संपूर्ण मुंबईचा विजपुरवठा सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एकाच वेळी बंद पडला. त्यामुळे कामानिमित्त निघणारे नोकरदार, ऑनलाईन शिकवणी घेत असलेले विद्यार्थी आणि गृहिणींसह साऱ्यांनाच याचा फटका बसला.
 
 
तिन्ही रेल्वे मार्गांवरील विज पुरवठा खंडीत झाला. चालती रेल्वे अचानक बंद पडल्याने नागरिकांनी रुळावरून मार्ग काढत इच्छीत स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला. सिग्नल यंत्रणेतही बिघाड झाला होता. महापारेषणच्या ४०० के व्ही कळवा, पडघा जीआयएस केंद्रात सर्कीट एकची देखभाल दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्कीट २ वर आला. त्यादरम्यान, सर्कीट दोनवर अचानक भार आल्याने मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली सह मुंबई महानगर परिसराचीतील विजपुरवठा एकाच वेळी खंडीत झाला. दुपारनंतर हा विजपुरवठा हळूहळू सुरळीत सुरू करण्यात आला आहे.
 
 
 
तीन तासांनंतर संपूर्ण प्रभावित झालेल्या परिसरांचा खंडीत विजपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. मुंबईत काही भागात १० मिनिटांमध्ये वीज पुन्हा आली होती. मात्र, काही ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी २.३० वाजले होते. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अदानी, बेस्ट, महावितरण यांच्या माध्यमातून विजपुरवठा करण्यात येतो. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आदेश उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121