जगातील महत्वाच्या शंभर ठिकाणांमध्ये 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : 'टाइम' या प्रसिद्ध अमेरिकन मासिकाने जगभरातील शंभर महत्वाच्या स्थानांची यादी जाहीर केली आहे. यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासीयांना ही आनंदाची बातमी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "स्टॅच्यू ऑफ युनिटीला टाइम मासिकाने जगातील सर्वाधिक महत्वाच्या पहिल्या शंभर ठिकाणांमध्ये स्थान दिले आहे. एका दिवसात तब्बल ३४ हजार पर्यटकांनी भेट देत हा विक्रम केला आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नोंद झाल्याबद्दल आनंद आहे."



 

 

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच अशा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी हे स्थळ खुले करण्यात आले.  या १८२ मीटर उंच पुतळ्याचे बांधकाम २०१० पासूनच सुरू करण्यात आले होते. गुजरात विधानसभेतील एकूण १८२ जागा आहेत. त्यामुळेच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची उंची १८२ मीटर ठरवण्यात आली होती. हा संपूर्ण पुतळा तयार करण्यासाठी २ हजार ९८९ कोटी इतका खर्च आला. एकूण ४ हजार, ७६ इतक्या मजुरांनी मिळून हा पुतळा तयार केला आहे. 


 

@@AUTHORINFO_V1@@