श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरीसाठी तिनशे ज्यादा बस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |



नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे. या भाविकांच्या वाहतुकीसाठी एस.टी. महामंडळाच्या वतीने ३०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मेळा बसस्थानकाचे काम सुरू असल्याने यंदाही जादा बसेस ईदगाह मैदान येथूनच सोडण्यात येणार आहेत.

आध्यात्मिकदृष्ट्या तिसर्‍या श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने खासगी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक एस.टी. महामंडळाच्या बसेसद्वारे त्र्यंबकेश्वर येथे जात असतात. भाविकांच्या वाहतुकीसाठी यंदाही एस.टी. महामंडळाकडून विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. पहिल्या दोन श्रावण सोमवारी पावसामुळे येथील गर्दी रोडावल्याचे दिसून आले होते.

मात्र, तिसर्‍या श्रावण सोमवारास विषेश महत्त्व असल्याने आणि त्यातच थोडीफार का होईना, पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांची गर्दी या सोमवारी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिकरोड आणि निमाणीमधूनही जाणार बस

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानकासह सिडको येथूनही त्र्यंबकेश्वरसाठी बस मार्गस्थ होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत श्रावणी सोमवारच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@