जम्मू काश्मीर सीमावर्ती भागात स्वातंत्रदिनाचा जल्लोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |


 

राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येत साजरी केला जल्लोष

 

जम्मू आणि काश्मीर : राजौरी आणि पूंछ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हिंदू आणि मुस्लिम बांधवानी अनोखा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आणि स्वातंत्रदिनाचा एकत्रित जल्लोष साजरी केला. राजौरीमधील नागरिकांनी एकत्रित येत तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. 'भारत माता कि जय'च्या जयघोषात मिठाई वाटण्यात आली. भाजपचे राजौरी विधानपरिषद सदस्य विबोध गुप्ता हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. जम्मू-काश्मीरला न्याय मिळवून देणे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. रॅलीत स्थानिक प्रतिनिधी नायब पंच मुहम्मद सगीर, खडम मलिक, इक्बाल आणि लतीफ युनूस हे देखील उपस्थित होते. 
 
 
 

 

यावेळी विबोध गुप्ता म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. पण काही लोक जम्मू-काश्मीरबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापासूनच जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे दलित आणि महिला यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले होते, पण आता त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकारचेही त्यांनी यावेळी आभार मानले. राज्यातून दहशतवाद आणि भेदभाव दूर केल्याबद्दल सर्वांनी संयुक्तपणे सरकारचे आभार मानले.
 
 

 
@@AUTHORINFO_V1@@