आश्चर्यजनक : देशातील २३ विद्यापीठे बोगस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील बोगस विद्यापीठांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ८ विद्यापीठे उत्तरप्रदेशातील आहेत. देशभरातील एकूण २३ विद्यापीठांची नावे बोगस विद्यापीठांच्या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा यामध्ये समावेश आहे. अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचे विद्यार्थ्यांनी टाळावे, असे निर्देशही विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी न घेता किंवा कायद्याची, तसेच कागदपत्रांची पूर्तता न करताच अनेक विद्यापीठांनी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अशा बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन आपले नुकसान करण्याचे विद्यार्थ्यांनी टाळावे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी व्यक्त केली आहे.

 

बोगस विद्यापीठांच्या यादीत ८ विद्यापीठे उत्तरप्रदेशातील, ७ दिल्लीमधील, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पुडुचेरी येथील प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील राजा अरेबिक विद्यापीठाचा बोगस विद्यापीठांच्या यादीत समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@