चर्चगेट स्थानकानजीक होर्डिंग कोसळून १ ठार

    12-Jun-2019
Total Views | 40



 

मुंबई : चर्चगेट स्थानकानजीक होर्डिंग अंगावर कोसळल्याने जखमी झालेल्या ६२ वर्षीय पादचाऱ्याचा उपचाऱादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य दोघे पादचारीही जखमी झाले. मधुकर आप्पा नार्वेकर, असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलीसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

 

चर्चगेट स्थानकाबाहेरील रेल्वे इमारतीवर बसवण्यात आलेले होर्डिंग दुपारी पावणे एकच्या सुमारास कोसळले. त्यात नार्वेकर यांना गंभीर इजा झाली. त्यांना जीटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

चर्चगेट स्थानकाबाहेर रेल्वेच्या इमारतीवर महात्मा गांधी यांचे १५ फूटी चित्र तयार साकारण्यात आले आहे. बुधवारी दुपारी यातील ६ चौकोनी भाग खाली कोसळले. यात तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या भागातून प्रवाशांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. स्थानकाच्या इमारतीवर ऑक्टोबर २०१७ रोजी रंगकाम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ब्राझीलचे स्ट्रीक आर्टिस्ट एडुआर्डो कोबरा यांनी इमारतीवर महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटले होते.

 


वायू चक्री वादळाचा धोका ?

मुंबईच्या किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर 'वायू' चक्रीवादळ घोंगावत आहे. परिणामी मुंबईतील अनेक भागांत वाऱ्याचा जोर आहे. यातूनच महात्मा गांधी यांच्या चित्राचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वांद्रे पश्चिम येथे जोरदार वाऱ्यामुळे स्कायवॉकच्या छताचा भाग कोसळून तीन जण जखमी झाल्याची माहीती महापालिकेकडून देण्यात आली आहे. यात मलिसा नजारत (३०), सुलक्षणा वझे (४१) आणि तेजल कदम (२७) आदी जखमी झाले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121