भारतीय सेनेला सापडले हिममानवाचे ठसे

    30-Apr-2019
Total Views | 219

 

 
भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय सेनेच्या माउंटनियरिंग एक्सपेडिशन टीमला ९ एप्रिल रोजी सेनेच्या नेपाळमधील मकालू बेस कॅम्पजवळ 'येति' या हिममानवाचे ठसे सापडल्याचा संशय भारतीय सेनेने व्यक्त केला आहे. ३२ बाय १५ इंच इतके मोठे हे ठसे आहेत.

 

भारतीय सेनेच्या अधिकृत अकाऊंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली असून हा प्राणी या आधी फक्त मकालू-बारून नॅशनल पार्कमध्येच आढळून आला होता. भारतीय सेने आता याविषयी आणखी तपस घेत आहे. या ट्विटमध्ये तुम्ही त्या हिम-मानवाचे ठसे पाहू शकता आणि अंदाज लावू शकता की तो किती अवाढव्य असेल.

कोण आहे 'येति' ?

येति हा नेपाळी लोकपरंपरेतील प्राणी आहे. नेपाळच्या लोककथांमध्ये या प्राण्याचा उल्लेख आपल्याला सापडू शकतो. हा प्राणी 'एप' या माकडासारखा दिसतो आणि त्याला प्रचंड केस असतात. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर पाहता येतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121