पुष्कर श्रोत्रीच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रंगणार ‘पुष्कर शो THREE’

    25-Apr-2019
Total Views | 53

 
मुंबई : यशाची उत्तुंग शिखर गाठली तरी काही कलावंत आपली मातीशी असलेली नाती कधी विसरत नाहीत. समाजाशी त्यांनी तरीही आपला ऋणानुबंध जपलेला असतो. मराठी चित्रपटसृष्टीत दोन दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडत लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री येत्या ३० एप्रिल रोजी वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्ताने, ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

यामध्ये पुष्कर श्रोत्री यांच्या सध्या सुरु असलेल्या आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवीया तीन नाटकांचा महोत्सव दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे येत्या ५ मे रोजी होणार आहे. विशेष म्हणजे महोत्सवातील तीनही प्रयोगाचे उत्पन्न सामाजिक संस्थांना दिले जाणार आहे.

 

दिवसभर चालणाऱ्या पुष्कर शो THREE’ या नाट्य महोत्सवातून प्रत्येक संस्थेला जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याचा पुष्कर श्रोत्री यांचा मानस आहे. अभिनेता म्हणून आपण मला आजपर्यंत दाद दिली आहे, या प्रयोगाच्या निमित्ताने मला साथ देऊन प्रयोग हाऊसफुल करावेत असे आवाहन पुष्कर श्रोत्री यांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121