धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला विश्वास

 

सांगली : धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ जानकर सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर भाजप मित्रपक्ष आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

 

पत्रकार परिषदेत धनगर आरक्षणावर एका प्रश्नाला उत्तर देताना जानकर म्हणाले, "धनगर आरक्षणाची सुरुवात मीच केली, यासाठी दिल्ली येथे मी पहिला मोर्चा काढला होता आणि या समाजाला न्यायदेखील मीच देणार आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण दिले असून आता फक्त राजकीय आरक्षण बाकी आहे." यासोबतच ओबीसी कमिशनला याआधी घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असेही जानकर म्हणाले.

 

धनगर समाजाच्या शेळी-मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून १ हजार कोटी देण्यात येणार असून, याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@