ब्रेकींग न्यूज भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

भर दिवसा गोळ्या झाडून भाजप नगरसेवकाची हत्या

    17-Mar-2023
Total Views | 321
Vijay Tad

सांगली (Vijay Tad ) : जत तालुक्यातील भाजप नगरसेवक विजय ताड यांची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक ताड यांच्या वाहनावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली आहे. विजय शिवराज ताड यांच्या वाहनावर सुरुवातीला गोळीबार झाला. त्यानंतर ते गाडीतून निसटून पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि डोक्यात दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. भाजप नगरसेवक ताड यांच्या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. इनोव्हा गाडीतून जात असताना हल्लेखोरांनी गाठले. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121