इस्रोचा आणखी एक पराक्रम; शत्रूच्या हालचाली टिपणार

    01-Apr-2019
Total Views | 128


 


सतीश धवन स्पेस सेंटरवरून एमिसॅट आणि नॅनो उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण


श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज आणखी एक दमदार कामगिरी केली आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून एमिसॅट आणि नॅनो उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण केले आहे. सोमवारी सकाळी ९.२७ वाजता पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटच्या साहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटमधून एमीसॅटसोबत २९ नॅनो उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. यात अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११, स्पेनमधील १ तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.

 

इस्रो आणि डीआरडीओ या मिशनसाठी संयुक्तपणे काम करत आहेत. इस्रोचे हे संपूर्ण मिशन चार टप्प्यात होणार असून यासाठी सुमारे तीन तास लागणार आहेत. हे रॉकेट अंतराळात ७४९ किमी अंतरावर एमिसॅटला सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे सहज शक्य होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121