भारतासाठी आनंदवार्ता ! विंग कमांडर अभिनंदन भारतात परतणार

    28-Feb-2019
Total Views | 123


 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे उद्या भारतात परतणार आहेत. साऱ्या देशवासीयांकडून अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रार्थना सुरू होती. मात्र, आता त्यांच्या सुटकेच्या बातमीने भारताला दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारच्या ट्विटरून ही माहिती दिली आहे. हे शांततेची भावना असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 
 
 

भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर (वैमानिक) अभिनंदन वर्धमान बुधवारपासून ताब्यात आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ही माहीती दिली होती. अभिनंदन वर्धमान यांना सुखरुप परत पाठवण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. बुधवारी सकाळी पाकिस्तानात भारताचे जे विमान कोसळले होते. त्यात अभिनंदन वर्धमान हे वैमानिक होते.

 

अभिनंदन वर्तमान यांच्या सुटकेसाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. अभिनंदन संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे!”, अशी भावना देशवासीयानी व्यक्त केली होती. ट्विटरवर यूजर्स #ABhinandan आणि #BringBackAbhinandan हे हॅशटॅग वापरून अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केले जात आहेत. अभिनंदन वर्धमान हे मायदेशी सुखरुप परत यावेत. म्हणून भारत सरकारनेही आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव टाकण्यात आला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121