कुर्ला बस डेपोमध्ये भीषण आग

    10-Feb-2019
Total Views |



कुर्ला : नेहरूनगर येथील कुर्ला बस डेपोमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्त केलेली ९ वाहने जळून खाक झाली आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत दोन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मोठ्या बसेस पूर्णतः खाक झाल्या आहेत.

 

कुर्ला बस डेपोमध्ये मुंबई उपनगरातील आरटीओने जप्त केलेली अवजड वाहने ठेवली जातात. तसेच, नेहरूनगर एसटी बस आगारात मोठ्या प्रमाणात मुंबई बाहेरील एसटी बस, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा या राज्यातील बस थांबवतात. रविवारी अचानक लागलेल्या आगीने जवळपासच्या २० गाड्याना वेढले होते. अग्निशमन दलाच्या तीन बंबानी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे इतर वाहने सुरक्षित राहिले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121