आला मौसम रणजीचा ! ९५ दिवस ३८ संघ, कोण मारेल बाजी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

क्रिकेटच्या मैदानात शिरला साप... खेळाडूंची झाली पळापळ


saf_1  H x W: 0

 


मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा म्हणजे स्थानिक खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय संघामध्ये पदार्पण करण्याचा एक पूल मानला जातो. या स्पर्धेमुळे भारतीय संघाला अनेक दिग्गज खेळाडू प्राप्त झाले आहेत. अशा या तानाजीच्या मौसमाला सुरुवात झाली आहे. ३८ संघांमध्ये ही स्पर्धा ९ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या १३ मार्चपर्यंत चालणार आहे.

 

या स्पर्धेमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या मुंबईसंघाने तब्बल ४१ वेळा जेतेपद पटकावलेले आहे. तसेच, मागील २ वर्ष विदर्भ संघाने उत्तम खेळ करत २ वेळा हा करंडक जिंकला आहे. यावर्षी त्यांचे हॅट्ट्रिकचे स्वप्न पूर्ण होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच, यावर्षी चंडीगड या नव्या संघाचा समावेश करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या कर्नाटकचा संघही बलाढ्य मानला जात आहे.

 

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्या सहभागामुळे मुंबईचा संघ अधिक बळकट झाला आहे.स्पर्धेतील संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. 'अ' आणि 'ब' या गटांमध्ये एकत्रितपणे सर्वाधिक गुण मिळवणारे पाच संघ उपांत्यपूर्व फेरीत पात्र ठरतील. तर, 'क' गटातून दोन आणि 'प्ले' गटातून एक संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकेल.

 
 

वसीम जाफर - दीडशे बहाद्दर...

 
 
 

भारताचा माजी सलामीवीर आणि विदर्भ संघाचा कर्णधार वसीम जाफर याने पहिल्याच रणजी साम्यामध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केला. गतविजेता विदर्भाचा संघ आपला पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध खेळात आहे. या सामन्याला सुरुवात होताच अनुभवी वासिम जाफरचा हा रणजी क्रिकेटमधला १५० वा सामना ठरला. अशी अनोखी कामगिरी करणारा वासिम जाफर हा पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने एवढे रणजी सामने खेळले नाही. गेली ३ वर्ष जाफर विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

 

क्रिकेटच्या मैदानात शिरला साप... खेळाडूंची झाली पळापळ

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@