सुट्टीवरचा कारंजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019   
Total Views |


vedh_1  H x W:



नाशिकमधील
‘रविवार कारंजा’ हा महापलिकेच्या लेखी अज्ञातवासात आहे काय, अशीच शंका या कारंज्याचे आताचे रूप पाहून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा कारंजा बंद आहे. यातील पाणीदेखील आहे तसेच आहे. कारंजाच बंद असल्याने पाणी प्रवाही नाही. त्यामुळे हा कारंजा म्हणजे सध्या दूषित पाण्याचे साचलेले डबके झाला आहे.



‘रविवार
’ हा भारतात ‘सुट्टीचा वार’ म्हणून गणला जातो. त्याच प्रमाणे नाशिकमधील ‘रविवार कारंजा’ हा गेले अनेक दिवस सुट्टीवर असून तो सध्या खर्‍या अर्थाने ‘रविवार कारंजा’ ठरत आहे. शहरातील महत्त्वाचे चौक हे सुशोभित असे असावे. या मार्गांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनादेखील आल्हाददायक वाटावे यासाठी वाहतूक बेटे आणि आकर्षक कारंजे यांची रचना शहरात करण्यात येत असते. मात्र, येथील ‘रविवार कारंजा’ हा महापलिकेच्या लेखी अज्ञातवासात आहे काय, अशीच शंका या कारंज्याचे आताचे रूप पाहून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा कारंजा बंद आहे. यातील पाणीदेखील आहे तसेच आहे. कारंजाच बंद असल्याने पाणी प्रवाही नाही. त्यामुळे हा कारंजा म्हणजे सध्या दूषित पाण्याचे साचलेले डबके झाला आहे. सध्या नाशिक शहरात डेंग्यूच्या आजाराने हैदोस मांडला आहे. यासाठी नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करणारी नाशिक मनपा मात्र, या कारंजाचे पाणी का काढत नाही किंवा कारंजा का चालू करत नाही हा प्रश्न नागरिकांना सध्या सतावत आहे.



कारंज्याच्या साचलेल्या पाण्यात शेवाळ आले असून डासांची उत्त्पती होण्यास अत्यंत अनुकूल वातावरण येथे उपलब्ध आहे
. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत नाशिक मनपा मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का, अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. या परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमा राबविण्यासाठी महापालिका पथक वारंवार येत असते. तरीही त्यांचे लक्ष या कारंज्याकडे जात नाही. याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथून लागूनच असलेल्या मेनरोडवर नाशिक महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय आहे. तेथील कर्मचारी अधिकारी रविवार कारंजा परिसरातूनच मार्गक्रमण करत असतात. त्यांचेही लक्ष येथे न जाणे हे मोठे न उलगडणारे कोडेच आहे. या कारंज्यावर नाशिकमधील प्रथितयश अशा शिक्षण संस्थेची जाहिरातदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे दोन पालक असतानादेखील हा कारंजा अनाथ असल्यासारखाच शहराच्या मध्यवस्थित उभा आहे. हे निश्चितच खेदजनक आहे.



रया गेलेली
‘शिवशाही’


नाशिक ते पुणे या प्रवासात प्रवाशांना आरामदायी आणि आल्हाददायी प्रवासाचा आनंद लुटता यावा यासाठी एशियाड बसऐवजी
‘शिवशाही’ बस सेवा सुरू करण्यात आली. महामंडळामा़र्फत सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रवाशांच्या पसंतीसदेखील उतरली. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद मिळायला लागल्यावर महामंडळ आता प्रवाशांना गृहीत धरू लागले आहे की काय, अशी शंका सध्याची ‘शिवशाही’ची स्थिती पाहून येते. नेहमी होणारे अपघात, अत्यंत खराब सीट, तुटलेले सीटचे हँडल, थुंकण्याचे व्रण असलेल्या घाणेरड्या काचा, पुशबॅक सुविधेची झालेली दुरवस्था, उत्तम शॉक ऑब्झर असल्याचे दावे करूनदेखील बसणारे हादरे म्हणजे ‘शिवशाही’ अशी सध्याच्या ‘शिवशाही’ची स्थिती झालेली आहे. ४१० रुपये मोजून आपण नाशिक ते पुणे या मार्गावर नक्कीच धडक गाडीची मजा या ‘शिवशाही’च्या माध्यमातून घेऊ शकतो हे निर्विवाद. नाशिक ते पुणे या चार ते पाच तासांच्या अंतराला विमान सेवेस नागरिक का पसंती देत आहेत, हे या शिवशाही बसमधून प्रवास केल्यावर आपल्या सहज लक्षात येते.



खाजगी लक्झरी बस सेवेला चपराक बसावी
, प्रवाशांनी महामंडळाच्याच सेवेचा लाभ घ्यावा, खाजगी लक्झरी बससारख्या सुविधा एसटीतदेखील उपलब्ध असाव्यात हा ‘शिवशाही’ बस सुरू करण्यामागे उद्देश होता. मात्र, यातील सर्व वानवा पाहता निश्चितच प्रवाशी खाजगी लक्झरी बससेवेला पुन्हा प्राधान्य देतील, अशीच आता दाट शक्यता आहे. आपला सातत्याने घटणारा महसूल वृद्धिंगत करण्यात भलेही महामंडळाला रस नसेल. मात्र, ज्या शिवरायांच्या नावाने बससेवा सुरू केली आहे. त्यांच्या राज्यात अशी कोणतीही दुरवस्था नव्हती याचे भान महामंडळाने ठेवणे आवश्यक आहे असेच वाटते. प्रवासी वर्गाला योग्य माहिती न देणे, उर्मट बोलणे, यात धन्यता मानणार्‍या महामंडळातील कर्मचा़र्‍यांनीदेखील आपल्या ताफ्यातील या बस कशा नीटनेटक्या राहतील याबाबत महामंडळास सातत्याने अवगत करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘अशी कशी रया गेलेली शिवशाही’ असा सवाल देशातील आणि देशात येत या बससेवेने प्रवास करणारे परदेशी नागरिक नक्कीच महामंडळाला विचारतील हे नक्की.

@@AUTHORINFO_V1@@