विक्रम लँडर शोधण्याचे श्रेय 'या' भारतीय तरुणाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


vikram_1  H x W



चेन्नई
: भारतीय अंतराळ संशोधन संघटना 'इस्रो'च्या चांद्रयान २ या महत्वाकांक्षी मोहिमेतील 'विक्रम लँडर'चे अवशेष मिळाले असल्याचे पुरावे नासाने आज ट्विट केले. यात काही छायाचित्रे आहेत जे विक्रमच्या हार्ड विक्रम लँडर शोधण्याचे श्रेय 'या' भारतीय तरुणालाचे पुरावे देत आहे. मात्र नासाने हे पुरावे देत असतानाच याचे संपूर्ण श्रेय चेन्नई येथील षण्मुग सुब्रमण्यन या ३३ वर्षीय तरुणाला दिले आहे. षण्मुग सुब्रमण्यन या अभियंत्याने सर्वप्रथम विक्रमचे अवशेष नासाला दाखवून दिले. त्याने दाखवून दिलेला विक्रमचा भाग आघात झालेल्या मुख्य ठिकाणापासून ७५० मीटर वायव्येला आहे.



षण्मुग सुब्रमण्यन इंजीनियर आणि कंप्यूटर प्रोग्रामर आहे. सध्या तो
'लेनोक्स इंडिया टेक्नोलॉजी सेंटर' चेन्नई याठिकाणी कार्यरत आहे. मदुराई येथे राहणारा षण्मुग सुब्रमण्यन यापूर्वी 'कॉग्निझंट' येथे प्रोग्राम अ‍ॅनालिस्ट म्हणूनही काम करत आहे. १७ सप्टेंबर, १४ , १५ आणि ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी नासाच्या मून लूनर रिकॉनेसेंस ऑर्बिटरने (एलआरओ) घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला आणि विक्रमाचे हार्ड लँडिंग झाले असल्याचे ओळखले. षण्मुगने सर्वप्रथम ज्या ठिकाणी लँडर आदळले, तेथून जवळपास ७५० मीटरवर अवशेष पाहिले,' असे नासाने म्हटले आहे. नासासह एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीनंही त्याला दुजोरा दिला आहे. आदळण्याच्या आधी आणि नंतर घेतलेल्या फोटोची तुलना करण्यात आली. त्यातून लँडरचे अवशेष आणि आदळण्यामुळे चंद्राच्या मातीमध्ये झालेले बदल टिपता आले आहेत. विक्रमच्या आघातामुळे लहान विवर तयार झाले असून, लँडरचे अवशेष सुमारे पाच किलोमीटर दूर पर्यंत विखुरल्याचे छायाचित्रात दिसून येत आहे.






विक्रमाची ओळख पटल्यानंतर
, षण्मुगने त्याच्या शोधाबद्दल नासाला पत्र लिहिले. त्यानंतर नासाने त्याचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ घेतला आणि त्यांच्या शोधाची पुष्टी केली. नासाचे डिप्टी प्रोजेक्ट सायंटिस्ट (एलआरओ मिशन) जॉन केलर यांनी षण्मुगचे ईमेल करत 'आपण विक्रम लँडरच्या कोसळण्याच्या शोधाबद्दल आम्हाला ईमेल केले त्याबद्दल धन्यवाद' असे म्हणत आभार मानले. याबाबत षण्मुग सुब्रमण्यम याने माध्यमांशी बोलताना माहिती दिली. 'विक्रम लँडरचा संभाव्य मार्ग शोधण्यासाठी कठोर मेहनत केली. मी खूपच खूश आहे. अंतराळातील घडामोडी जाणून घेण्याची मला पहिल्यापासूनच आवड आहे,' असेही तो म्हणाला.

 

@@AUTHORINFO_V1@@