भर हिवाळ्यात मुंबईमध्ये पावसाची शक्यता ; हवामान खाते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी आली आणि गेले काही दिवस ती नाहीशीही झाली. परंतु, आता भर हिवाळ्यामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसापांसून ढगाळ वातावरण आहे. किमान तापमानात चार अंशाची वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या जवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मुंबईमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

 

मुंबईसह महाराष्ट्रामध्येही अवकाळी पावसाची शक्यता

 

मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना आणि परभणी या भागात बुधवारी हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. पूर्वेकड़ून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@