काश्मीरमुद्यावरून भारताला विरोध करणाऱ्या लेबर पक्षाचा ब्रिटनमध्ये पराभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019
Total Views |


conservative_1  



ब्रिटन
: सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी ब्रिटनमध्ये येऊ लागले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने बहुमताचा आकडा (३२६)गाठला. ब्रिटनमधील निवडणुकांचे प्राथमिक निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, विरोधी लेबर पार्टी देखील २०० जागा जिंकण्याच्या जवळ आहे. निवडणुकांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की," पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे बहुमताने पुन्हा निवडून आल्याबद्दल अभिनंदन. त्यांना शुभेच्छा देतो आणि भारत-ब्रिटन संबंध अधिक दृढ होण्यासाठी एकत्र काम करण्याची अपेक्षा करतो."

 


 

कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या विजयानंतर , पाउंडमध्ये २ टक्क्यांनी

 

ब्रिटनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या सत्तेत पुनरागमन होईल या आशेने पौंड स्टर्लिंग गुरुवारी जवळपास दोन टक्क्यांनी वधारले. जर ब्रिटनच्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवला गेला तर पंतप्रधान बोरिस जॉनसनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला स्वबळावर बहुमत मिळू शकेल,असे झाल्यास ब्रेक्झिटची प्रक्रिया वेगवान होईल. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी प्राथमिक निकालानंतर ट्विट केले आणि विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की,"यूके ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्या सर्वांचे आभार."





दुसरीकडे
, एक्झिट पोलमध्ये यापूर्वीच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या बोरिस जॉन्सन यांना बहुमत मिळाल्याचे दर्शविले गेले आहे. एक्झिट पोलच्या निकालांनुसार कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३६८ आणि लेबर पार्टीला १९१ जागा मिळू शकतात. निवडणुकीत पक्षाला मोठ्या पराभवाचा अंदाज वर्तविल्यानंतर जेरेमी कॉर्बीन यांनी कामगार पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा जाहीर केला आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार नसल्याचे कॉर्बिन यांनी सांगितले.

 


एक्झिट पोलमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाला ३६८ जागा


एक्झिट पोलमध्ये एकूण ६५० जागा असणाऱ्या संसदेत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३६८ जागा
, लेबर पार्टी १९१ जागा, स्कॉटिश नॅशनल पार्टी (एसएनपी), ५५ , लिबरल डेमोक्रॅट्स यांना १३ जागा मिळतील असा अंदाज होता.



कॉन्झर्व्हेटिव्ह
पक्षाच्या प्रीती पटेल म्हणाल्या
'निवडणूक जिंकल्यानंतर ब्रेग्झिट मुद्दा संपवू.'



एक्झिट पोलच्या निकालाला उत्तर देताना जॉन्सनच्या मागील मंत्रिमंडळातील भारतीय वंशाच्या प्रिती पटेल म्हणाल्या की
, "हिवाळ्याच्या हंगामात झालेली ही एक कठीण निवडणूक होती. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळावे यासाठी हा काळ योग्य आहे. निवडणुकीच्या सभांसाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. एक्झिट पोलचे निकाल आनंददायी आहेत." पटेल म्हणाले की," जिंकल्यानंतर, ब्रेक्झिट करार संपविणारे सरकार पहिलेच काम असेल. हे ख्रिसमसच्या आधी देखील होऊ शकते."

@@AUTHORINFO_V1@@