गांधीजींचा शत्रू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2019
Total Views |



फादर दिब्रिटोंना आपल्या विधानांतून केवळ हिंदूंवर निशाणा साधायचा आहे व तसे ते वागतही आहेत
. अर्थात त्यांनी कितीही गळे काढण्याचे प्रकार केले तरी त्यातून ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात, त्यांची बनवाबनवी लपून राहणार नाही. उलट अशा वक्तव्यांतून फादर दिब्रिटोंची ओळख धर्मांतराला विरोध करणाऱ्या गांधीजींचा शत्रू याच रूपात अधिकाधिक गडद होत जाईल.



धर्मप्रसाराचा अनैतिक मार्ग म्हणजे अन्नात कालवलेले विष आहे, जे सर्व अन्नाला बाधित करते. त्यामुळे सर्व प्रकारच्या ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या मी विरोधात आहे,” असे विधान महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळातील ख्रिश्चन मिशनरी व धर्मप्रचारकांचे चालचलन पाहून केले होते. तर आता, “धर्म कुठलाही असो, तो जर उदारतेची, सर्व जगाच्या कल्याणाची शिकवण देत असेल आणि या वैशिष्ट्यांमुळे तो एखाद्या व्यक्तीला स्वीकारायचा असेल, तर त्यात कायद्याची आडकाठी कशाला हवी? अशा धर्मांतराचा हक्क भारतीय संविधानाने नागरिकांना प्रदान केला असूनही हे वास्तव विसरून जर कोणी धर्मांतरबंदी कायद्याची मागणी केली तर माझ्या मते तो विवेकावर केलेला हल्ला आहे,” असे मत ख्रिस्ती धर्मगुरू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभानंतर दिब्रिटो यांनी आपली ही विचारमौक्तिके मांडली.



फादर दिब्रिटो यांची ही विधाने वाचल्यानंतर कोणी साहित्यिक वा लेखक नव्हे
, तर ख्रिस्ती धर्मप्रचारकच भाषण करत असल्याचे म्हटले पाहिजे, इतकी ती आक्षेपार्ह आहेत. वस्तुतः फादर दिब्रिटो यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याचे स्वागत आणि अभिनंदन करणारी भूमिका आम्ही घेतली होती व सर्वांच्या मनात उमटणार्‍या प्रश्नांवर पुरोगामित्वाचा वसा घेतलेल्या दिब्रिटोंनी बोलावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. ते प्रश्न धर्मांतरित अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींशी केला जाणारा भेदभाव, नन्सवरील अत्याचार, समलैंगिकता व गर्भपाताशी संबंधित चर्चची मागासलेली भूमिका आदींशी संबंधित होते. मात्र, चांद्यापासून बांद्यापर्यंत सत्काराचे हारतुरे स्वीकारत फिरणार्‍या व इतरांना उपदेशाचे डोस पाजणार्‍या फादरनी कधी त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. म्हणूनच स्वधर्माचा विषय निघाला की, फादर दिब्रिटो यांची विवेकबुद्धी नेमक्या कुठल्या घंटेच्या किणकिणाटात विरून जाते, याचा शोध घेतला पाहिजे, असे वाटते.



आताचा मुद्दा धर्मांतरबंदी कायदा व विवेकाशी संबंधित आहे
. परंतु, मुळात असा कायदा केला जावा, ही मागणी का केली जाते, याचाही विचार केला पाहिजे. भारतावर गेल्या दीड हजार वर्षांपासून विविध परकीय आक्रमकांनी हल्ले केले व इथला धर्म-संस्कृती नष्ट करण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न केले. मुस्लिमांनी तलवारीच्या टोकावर आणि ख्रिश्चननांनीही ताकदीच्या व सेवाकार्याच्या माध्यमातून हिंदूंना आपल्या धर्मात ओढण्याचे उपद्व्याप केले. भारतात ब्रिटिशांच्या आणि गोवा, वसई, दादरा-नगर हवेली, पुदुच्चेरी वगैरे भागात पोर्तुगीजांच्या राजवटीत हिंदू-अनुसूचित जाती-जमातींतील लोकांच्या, वनवासींच्या धर्मांतरासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला गेला. त्यात धर्मादाय शाळा, दवाखाने यांचा जसा समावेश होता, तसाच गोव्यातील ‘इन्क्विझिशन पोल’सारख्या छळस्तंभाचाही महत्त्वाचा वाटा होता. स्वातंत्र्यानंतरही सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षतेच्या खुळ्या संकल्पनांच्या मागे वेडावलेल्यांनी इथल्या हिंदू समाजाला अहिंदू करण्यासाठी आघाडी उघडलेल्यांना प्रोत्साहन दिले.



त्यातूनच ईशान्य भारतातील बहुसंख्य जनता आणि केरळ
, आंध्र प्रदेश, ओडिशा वगैरे भागांतील गरीब, अज्ञानी, मागासलेल्या लोकांना ख्रिस्ती करून घेतले गेले. आता इथे जर कोणी असे विचारले की, ही सर्वच माणसे स्वेच्छेने धर्मांतरित झाली का? तर त्याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’, असेच आहे. कारण भोळ्याभाबड्या, आजारी, दरिद्री जनतेला ख्रिश्चन धर्माची तत्त्वे ऐकून, त्यावर विवेकाने विचार करून धर्मांतर करण्याइतका वेळच नाही. तो आपल्या दैनंदिन कामाच्या रामरगाड्यातच इतका व्यग्र असतो की, धर्माचे चिंतन करून स्वतःचा मूळ धर्म सोडून नवा धर्म स्वीकारण्याची त्याची परिस्थितीच नाही. म्हणूनच अपवाद वगळता बहुतांश धर्मांतरे ही विविध प्रलोभने, आमिषे दाखवूनच केल्याचे या सगळ्यातून समजते. धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता या प्रकारे केल्या जाणार्‍या धर्मांतरामुळेच निर्माण झालेली आहे व ती न्याय्यही आहे. तसेच धर्मांतराला होणारा विरोध आजचा नाही तरमी सांगतो म्हणून तू माझ्या धर्माचा स्वीकार केला पाहिजे,’ असे दमदाटी करून वा लालूच दाखवून पहिल्यांदा जेव्हा कोणी म्हटले त्या दिवसापासून हा विरोध सुरू झालेला आहे व पुढेही सुरूच राहिल.



भारतात ख्रिश्चन व मुस्लिमांनी केलेल्या धर्मांतराविरोधात आधुनिक काळात आवाज उठवणार्
यांमध्ये जसा महर्षी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांचा समावेश होतो, तसाच महात्मा गांधी यांचाही होतो. स्वामी विवेकानंद शिकागोच्या आपल्या जगप्रसिद्ध भाषणात धर्मांतराविषयी म्हणतात की, “सर्व धर्मांमध्ये समानता असावी यासाठी एका धर्माने दुसर्‍या धर्मावर विजय मिळवावा, अशी तुमची अपेक्षा असेल तर ते चुकीचे आहे. माझीही अपेक्षा नाही की ख्रिश्चनाने हिंदू व्हावे. तसेच मी हीसुद्धा इच्छा बाळगणार नाही की, हिंदूने वा बौद्धाने ख्रिश्चन व्हावे.” तसेच, “पावित्र्य, निर्मळता आणि समाजविकास जगातील कुठल्याही चर्चचे एकमेव अधिकार नाहीत.



जर कोणालाही दुसर्‍या धर्माचा विनाश करून स्वतःच्या धर्माचेच अस्तित्व ठेवण्याची स्वप्ने पडत असतील तर
, मला माझ्या हृदयाच्या खोलीपासून त्याची कीव करावीशी वाटते,” असे स्वामी विवेकानंद यावेळी म्हणाले. विवेकानंदांवर अशाप्रकारे बोलण्याची वेळ का आली असावी? तर त्यावेळची भारतासह जागतिक परिस्थितीच अशी होती व ख्रिश्चन मिशनरी आपल्याव्यतिरिक्त इतर सर्वांनाच ख्रिस्ती करण्यासाठी हपापलेले होते. अशाच प्रकारे ख्रिश्चन धर्मप्रसारावर महात्मा गांधींनीही ताशेरे ओढत आक्षेप घेतले होते. गांधीजी म्हणतात की, “दुसर्‍याच्या हृदयाला केवळ आध्यात्मिक शक्तीसंपन्न व्यक्तीच प्रभावित करू शकतो. मिशनरी केवळ गोड बोलू शकतात. ते आध्यात्मिक शक्तीने संपन्न नाहीत. मिशनर्‍यांद्वारे वाटला जाणारा पैसा म्हणजे धनपिशाच्च आहे.” आणि “मी समजुतीने केलेल्या धर्मांतराविरोधी नाही. परंतु, या आधुनिक फसव्या पद्धतीच्या मी विरोधात आहे. आजकाल धर्मांतर हा सुद्धा एक धंदा झाला आहे. धर्मांतराचा दरडोई खर्चाचा अहवाल मी वाचला आहे व त्याच्या आधारावर ‘नवीन पीक’ घेण्यासाठी बजेट केले जाते, याला धंदा नाही तर अन्य काय म्हणणार? यामुळे आध्यात्मिक उन्नती कशी साधली जाणार? यावरून हे निश्चित होते की, भारतात धर्मांतराची प्रलोभनाद्वारे आवश्यकता नाही. जर आवश्यकता असेल तर ती आत्मशुद्धीची आहे. आत्मसाक्षात्काराची आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारामुळे ते होत नाही,” अशा विविध विधानांतून महात्मा गांधींनी ख्रिश्चनांच्या धर्मांतरमोहिमेबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली होती.



फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी धर्मांतर व धर्मांतराला केल्या जाणार्‍या विरोधाचे वास्तव एकदा समजून घेतले पाहिजे
. परंतु, पांढराशुभ्र झगा फाडून समोर येणारे, अडचणीत टाकणारे हे सत्य आणि तथ्य फादरच्या कसे पचनी पडेल? म्हणूनच हा सगळाच प्रकार सर्वांपुढे उघड होऊ नये म्हणून ते ठिकठिकाणी विवेकाचे, धर्मनिरपेक्षतेचे नाव घेऊन टीकेचे चर्‍हाट लावत असावेत. मात्र, सर्वधर्मसमभावाचा गांजा ओढणार्‍या ज्या कोणी त्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले, त्यांचेही विद्रूप चेहरे यानिमित्ताने झगझगीतपणे समोर येत आहेत. दुसरीकडे धर्मांतरामुळे स्थानिकांच्या अस्मिता, प्रतिके व परंपरांवरून विविध प्रश्नही निर्माण होतात.



काही दिवसांपूर्वी वसईतील एका महिलेला घरात हिंदू पूजापद्धती
, सणोत्सव साजरे करण्यावरून मारहाणीची घटनाही घडली होती, हे तशा वादाचे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण. सोबतच धर्मांतरामुळे राष्ट्राराष्ट्रांत हेवेदावे उद्भवल्याचे प्रसंगही काही कमी नाहीत. महात्मा गांधींनी यासंबंधानेच, “भारतातील ख्रिश्चनीकरण अराष्ट्रीयता व युरोपीकरणाचा पर्याय झालेला आहे.” आणि, “प्रत्येक राष्ट्र आपला धर्म दुसर्‍या राष्ट्रांच्या धर्माइतकाच पवित्र मानते. अर्थात, भारताचा धर्म त्याच्या लोकांसाठी पुरेसा आहे. भारतात कसल्याही प्रकारच्या धर्मांतराची आवश्यकता नाही,” अशा थेट शब्दांत आपली भूमिका मांडली होती. अशावेळी विवेकाचा जप करणार्‍यांनी किंवा माणुसकीच्या नावाने आरडाओरडा करणार्यांनी मानवधर्माचा खरा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. परंतु, फादर दिब्रिटोंना आपल्या विधानांतून केवळ हिंदूंवर निशाणा साधायचा आहे व तसे ते वागतही आहेत. अर्थात त्यांनी कितीही गळे काढण्याचे प्रकार केले तरी त्यातून ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात, त्यांची बनवाबनवी लपून राहणार नाही. उलट अशा वक्तव्यांतून फादर दिब्रिटोंची ओळख धर्मांतराला विरोध करणार्‍या गांधीजींचा शत्रू याच रूपात अधिकाधिक गडद होत जाईल.

@@AUTHORINFO_V1@@