स्वातंत्र्यवीर सावरकरच खरे धर्मनिरपेक्ष नेते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2019
Total Views |






मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपवाद वगळता स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा धर्मनिरपेक्ष नेता झाला नसल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्यवीरांचे नातू रणजित सावरकर यांनी केले. राष्ट्रपती पदक विजेते सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या संकल्पनेनुसार डोंगरी पोलीस ठाणे आणि जे. जे. पोलीस ठाणे यांच्या वतीने ’सावरकर विचार मंथन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणजित सावरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.



ब्रिटीश सत्तेला हादरवणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानात दुहेरी जन्मठेपेवर पाठविताना सर्वप्रथम डोंगरीच्या कारागृहात काही काळ ठेवण्यात आले होते
. त्याच कारागृहात त्यांचे वंशज अर्थात नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. ज्या कोठडीत लोकमान्य टिळक आणि लोकाग्रणी आगरकर यांनी कारावास भोगला त्याच कोठडीत सावरकरांचंही वास्तव्य होते. त्या ऐतिहासिक वास्तूत या तिन्ही नेत्यांच्या स्मृती पुन्हा जागवण्यात आल्या. स्मारकाच्या वतीने तेथील अधिकारी राहुल कंठेकर यांना स्वातंत्र्यवीरांचा पुतळा आणि त्यांची ग्रंथसंपदा भेट देण्यात आली. ही वास्तू जतन करण्यासाठी सावरकर स्मारक सर्व सहकार्य करेल असे मंजिरी मराठे यांनी सांगितले.



सावरकरांचे अलौकिक कार्य आणि त्यांच्यावरील आक्षेपांबाबत
दोन्ही वक्त्यांनी आपले परखड विचार व्यक्त केले. रत्नागिरीतील तेरा वर्षांच्या स्थानबद्धतेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या अनोख्या कार्याबाबत मंजिरी मराठे यांनी सविस्तर माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल रणजित सावरकर यांनी त्यांना सन्मानित केले. तसेच डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागडीकर आणि जे. जे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांचाही सावरकर स्मारकाच्या वतीने सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट सेवेकरिता डोंगरी पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक प्रकाश दिनकर तसंच पोलीस शिपाई गणेश शिंत्रे आणि भरत जाधव, देविदास गायकवाड यांचा दोन्ही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@