मुंबई : महाविकासआघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गुरूवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अशातच माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
“एका बाजुला उद्धवचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालं आणि त्याचं वेळेला मालवण शिवसेना नगराध्यक्ष आणि अधिकारी एक ठेकेदाराकडून पैसे घेताना स्टिंग ऑपरेशन मध्ये अडकले. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे,” अशा आशयाचं ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती.
एका बाजुला उद्धवचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालं आणि त्याचं वेळेला मालवण शिवसेना नगराध्यक्ष आणि अधिकारी एक ठेकेदाराकडून पैसे घेताना स्टिंग ऑपरेशन मध्ये अडकले. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 26, 2019
अनेक दिवसांपासून राज्यातील परिस्थितसंदर्भात वक्तव्य करताना ट्विटवरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या निलेश राणेंनी फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ट्विट केलं होतं. “काहींना वाटतं खेळ संपला पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच,” असं सूचक वक्तव्य निलेश यांनी केलं होतं.