लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सस यांनी युरोपिय संघातून बाहेर पडण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत गाठण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री युरोपियन संघातून मुक्त होण्यासाठीचे ब्रेग्झिट कराराचे विधेयक ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ कॉमन'मध्ये पारित करण्यात आले. जर खासदारांनी याविरोधात मतदान करण्याचा प्रयत्न करत मुदत उलटवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मध्यावधी निवडणूकांची घोषणा करू, असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधी पक्षांनी ११० पानी विधेयकाला घाईगडबडीत पारित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप लगावला आहे. याविषयावर आणखी वेळ द्यायचा नाही, असे बेरिस जॉनसन्स म्हणाले. आत्तापर्यंत या विषयात बरीच चालढकल झाली आहे. त्यामुळे हे विधायक पुन्हा असंमत झाल्यास मला नाईलाजाने मध्यावधी निवडणूका घोषित कराव्या लागतील.
संसदेत 'ब्रेग्झिट' करार विधेयकाच्या पहिल्या टप्प्यात ३९९ विरुद्ध २९९ अशी मते पडली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात वेळ कमी असल्याचे सांगत खासदारांनी यावर चर्चा करण्यासाठी नकार दिला. यावेळी ३०८ जणांनी समर्थनात तर ३२२ खासदारांनी विरोधात मतदान केले होते.
'ब्रेग्झिट'बद्दल युरोपियन महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ट टस्क यांनी सुचवले कि, 'ब्रेग्झिट'ची मुदत वाढवण्यासाठी आणखी वेळ द्यावा. यामुळे 'ब्रेग्झिट'ची वेळ टाळता येईल. मात्र, याबद्दल पंतप्रधान बेरिस जॉन्सस यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, अशा वेळकाढूपणामुळे इथे अस्थिरता निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
काय आहे इन्फोसिस वाद ? ज्यामुळे बुडाले गुंतवणूकदारांचे ५२ हजार कोटी !@Infosys #Infosys https://t.co/Q5z54RGMQk
— महा MTB (@TheMahaMTB) October 22, 2019