Congratulations to our space scientists! ISRO successfully launched PSLV C42, putting two UK satellites in orbit, demonstrating India's prowess in the competitive space business. @isro
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2018
'NOVASAR' आणि 'S1-4' अशी या दोन उपग्रहांची नावे आहेत. या दोन्ही ब्रिटिश उपग्रहांचे वजन ८८९ किलोग्रॅम आहे. इस्त्रोकडून सोडण्यात आलेले हे दोन उपग्रह पृथ्वीवरील घडामोडींवर लक्ष ठेवणार आहेत. फॉरेस्ट मॅपिंग, बर्फ आच्छादन, जमिनीचा वापर, पूर व नैसर्गिक आपत्ती यांवर या उपग्रहांद्वारे विशेष लक्ष ठेवता येणार आहे. जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताची ३०० बिलियन डॉलरपेक्षा जास्त भागीदारी आहे. कमी खर्चात अंतराळात उपग्रह पाठवण्याचे काम इस्त्रो करत आहे. इस्त्रोच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/