माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयींच्या अÏस्थचे गोदावरीत विसर्जन
जळगाव : भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहार वाजपेयी यांच्या अस्थिचे नाशिक येथे गोदावरी नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, राज्यमंत्री महादेव जानकर, खा. हरिश्चंद्र चव्हाण , भाजपा आमदार, नगरसेवक , भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
ना.महाजन यांनी वाजपेयी यांच्या अÏस्थचे विधिवत पूजन करुन रामकुंडात विसर्जन केले. तत्पूर्वी शोभा यात्रेव्दारे अस्थिकलश रामकुंडा पर्यंत आणण्यात आला. मार्गात नागरिकांनी कलशाचे दर्शन घेतले.