आंबे येथील शिरपूर पॅटर्न टाईप बंधार्‍यातील पाण्याची पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |
 
 

आंबे येथील शिरपूर पॅटर्न टाईप बंधार्‍यातील पाण्याची पाहणी

शिरपूर, २४ जून 


 तालुक्यातील आंबे येथे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्न टाईप बंधा-यात मुबलक पाणी आल्याने प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी सुरेश खानापूरकर यांच्यासोबत सकाळी सकाळीच पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, वरीष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, आंबे येथील वि.का. सोसायटी चेअरमन रमेश माळी, सरपंच कृष्णा पावरा, उपसरपंच संदीप देशमुख, शिरपूर पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, भालेराव माळी, सुनिल जैन यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
सुरेश खानापूरकर यांनी शिरपूर पॅटर्न अंतर्गत तालुक्यात केलेल्या कामांची यावेळी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. जलसंधारणाच्या कामांमुळे सर्वत्र पाण्याची मुबलकता व यशस्वीता स्पष्ट केली.
या बंधा-यांमध्ये पावसामुळे उपलब्ध मुबलक पाणी पाहून परिसरातील सर्व ग्रामस्थांनी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, वरीष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना धन्यवाद दिले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@