लाचखोर घरतला जामीन मंजूर

    22-Jun-2018
Total Views | 15



 

डोम्बवली : कडोंमपाचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. या जामिनावर उशिरा स्वाक्षरी झाल्या मुळे त्यांची शनिवारी कारगृहातुन सुटका होण्याची शक्यता आहे. १३ जूनला कडोंमपाच्या मुख्यालयातील दालनात आठ लाखांची लाच घेताना घरत आणि साथीदारांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. अटकेनंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. अखेर शुक्रवारी न्यायालयाने तिघांना जामिन मंजूर केला. अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचेची मागणी घरत याच्याकडून करण्यात आली होती. तर त्याच्या जामिनावर बुधवारी सुनावणी झाली. मात्र, गुरुवारी निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या निर्णयावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. मात्र उशिरापर्यंत आदेशावर स्वाक्षरी न झाल्याने दोन दिवसांपासुन ठाणे कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या घरतसह दोघांचा आता शनिवारी कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121