मोदींच्या व्यायामाचा हा व्हिडिओ पाहिला का ?

    13-Jun-2018
Total Views | 20



'निरोगी भारत' या संकल्पनेतून केंद्र सरकारने सुरु केल्या 'फिट इंडिया' या मोहिमेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत असताना आता दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहली याने दिलेल्या 'फिटनेस चॅलेंज'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती शेअर केला असून नागरिकांकडून मोदींच्या या व्हिडीओला मोठी पसंती मिळत आहे.


थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपला हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यामध्ये ते आपल्या घराच्या बाहेरील बागेत व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. वेगवेगळे 'वॉकिंग वर्कआऊट' आणि योगा करताना मोदींनी आपला हा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये विजयी ठरलेली माणिक बात्रा या दोघांना मोदींनी फिटनेस चॅलेंज दिले आहे.






गेल्या महिन्यामध्ये मोदींनी केलेल्या आवाहनानंतर देशात 'फिट इंडिया' अनोखी मोहीम सुरु झाली. यामध्ये अनेक जण आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत होते, तसेच आपल्या मित्रांना फिटनेस चॅलेंज देत होते. यामध्ये विराट कोहली याने आपला व्यायामाचा व्हिडीओ शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. यावर पंतप्रधान मोदींनी देखील हे आवाहन स्वीकारत लवकरच आपला व्यायामाचा व्हिडीओ शेअर करू असे म्हटले होते.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121