कर्नाटक भाजपकडून सरकारला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

    25-May-2018
Total Views | 12

येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी



बेंगळूरू : कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे नवे सरकार अस्तित्वात असल्यानंतर आता राज्यातील भाजप देखील आपल्या विरोधकांच्या भूमिकेमध्ये आले आहे. नव्या सरकारच्या बहुमत चाचणी अगोदरच भाजपने सत्ताधारी पक्षाकडे येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा २८ तारखेला भाजपकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा भाजप नेते येडीयुरप्पा यांनी आज दिला आहे. तसेच बहुमत चाचणी दरम्यान भाजपने सभा त्याग देखील केला आहे.

जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी म्हणू जेडीएस आणि काँग्रेसाने सभागृहाचे विशेष सत्र बोलावले होते. याचवेळी येडीयुरप्पा हे प्रथम सभागृहामध्ये बोलण्यासाठी म्हणून उभे राहिले, आपल्या भाषणामध्ये त्यांनी जेडीएस आणि कॉंग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, जनमत नाकारून या दोन्ही पक्षांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे, असे येडीयुरप्पा यांनी यावेळी म्हटले. तसेच दोन दिवसांमध्ये कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अन्यथा भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिली. व यानंतर लगेच भाजपच्या सर्व आमदारांनी सभा त्याग करून सभागृहाच्या बाहेरचा रस्ता धरला.

दरम्यान भाजपच्या या इशाऱ्यावर सत्ताधारी पक्षाने मात्र अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपने सभा त्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी आपला विश्वास मताचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला व त्यानंतर भाजप आणि जेडीएसच्या ११७ आमदारांनी कुमारस्वामी यांना आपला पाठींबा जाहीर केला. या ११७ आमदारांच्या पाठिंब्यामुळे कुमारस्वामी यांनी लीलया सभागृहाचे बहुमत जिंकले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंचा युतीबद्दल

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121