भाजपाचा स्थापना दिवस आनंदात

    07-Apr-2018
Total Views | 5
 
  
 
जळगाव, ६ एप्रिल :
भारतीय जनता पक्षाला ६ एप्रिल रोजी यशस्वी ३८ वर्ष पूर्ण झाले. या स्थापना दिनानिमित्त शहरातील भाजप कार्यालय, वसंत स्मृती येथे कार्यकर्त्यांनी भारतमाता आणि स्व. पंडित दीनदयालजी उपाध्याय, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमाचे पूजन केले आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला.
 
 
भाजपच्या स्थापनादिनानिमित्त मुंबई येथे आयोजित महामेळाव्यासाठी शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पवार, अशोक लांडवंजारी, प्रवीण कुळकर्णी, संजय मोरे, दिलीप माहेश्वरी, निलेश झोपे, डॉ. अभिषेक ठाकूर, प्रकाश पंडित, कृष्णा नेमाडे, रामदास गवळी, गणेश माळी, गजानन वंजारी, सौरभ सगलगिले आदी उपस्थित होते. प्रभाकर पवार व अशोक लांडवंजारी यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली. समाजसेवा करा, पक्षाची प्रतिमा उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतमाता व भाजपचा जयजयकार करण्यात आला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121